
कोऱ्हाळे बुद्रुक येथील रॉयल पब्लिक स्कूल मध्ये ' आझादी का अमृत महोत्सव ' थीम मध्ये मासिक स्नेह संमेलन उत्साहात
Saturday, August 6, 2022
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
मोरया प्रतिष्ठान संचलित रॉयल पब्लिक स्कूल येथे मासिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. आझादी का अमृत महोत्सव अशी या संमेलनाची थीम होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते संतोष गावडे सर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रवींद्र खोमणे, विनोद खोमणे उपस्थित होते. यावेळी बालचमुंनी कविता, कथा, नृत्य, नाटिका सादर करून उपस्थित पालकांची मने जिंकली.
प्रमुख पाहुणे संतोष गावडे बोलताना म्हणाले की शाळे बरोबरच पालकांनी ही आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. मोबाईल, टीव्ही चे प्रमाण कमी करायला हवे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायला हवा.
मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अनिता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रास्ताविक प्राचार्य स्वाती सावळकर यांनी केले तर सूत्रसंचालन आरती शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका निकिता खलाटे, भाग्यश्री सोनवणे, मनीषा जाधव यांनी परिश्रम घेतले