
माणुसकी दाखवणे भोवले; २ चोरट्यानी पाणी प्यायच्या बहाण्याने महिलेला लुटले, १ लाख ३३ हजारांचा ऐवज लंपास
Thursday, August 25, 2022
Edit
बारामती- काल दि. 24/8/2022 रोजी दुपारी 3/30 च्या सुमारास मौजे आंबी बु. गायरान पाटी पाण्याचे टाकी जवळ ता बारामती जि. पुणे.येथील रंजना भाउसाहेब जगताप यांच्या घरामध्ये असताना घरासमोर दोन अज्ञात इसम मोटार सायकलवर येवुन त्यांना पिण्यासाठी पाणी मागुन घेतले त्यांना रंजना जगताप यांनी घराचा दरवाजा उघडुन त्यांना पाणी दिले.
त्यावेळी जगताप यांना त्यांचा संशय आल्याने रंजना जगताप यांनी घराकडे जावुन दरवाजा लावत असताना त्यांनी घराचा दरवाजा जोरात ढकलुन त्या दोघापैकी एकाने चाकुचा धाक दाखवुन जगताप यांच्या अंगावरील 1) 50,000/- रुपये रक्कमेचे सोन्याचे मनी व दोन सोन्याचे डोलें काळे मन्याचे पोतीमध्ये वोवलेले एक तोळा वजमाने मनी मंगळसूत्र वा किं. अं. वर्णना सोन्याचे दागीने, 50,000/- रुपये रक्कमेचे दोन सोन्याची कर्ण फुले व त्याला वेल असलेले एक तोळा वजनाचे जु.वा. फि. अ., 20,000/- रुपये रक्कमेची एक सोन्याची अंगठी बदामचे आकाराची चार ग्राम वजनाची जु वा कि .अ., कपाटात ठेवलेले 13,000 /- रूपये रोख रक्कम असा मिळून 133000 रुपये बळजबरीने चोरून घेवुन गेले आहेत.
जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हाचा वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना पाठविला असून पुढील तपास पो स ई शेख सो हे करीत आहेत.