
अमृत महोत्सवाची जय्यत तयारी; तरडोली येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलांची प्रभात फेरी काढुन जनजागृती
Sunday, August 7, 2022
Edit
मोरगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने घरोघरी तिरंगा फडकविला जाणार आहे. यानिमित्ताने तरडोली येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुलांची प्रभात फेरी काढुन जनजागृती करण्यात आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने दि १३ ऑगस्ट ते दि १५ ऑगस्ट पर्यंत घरोघरी, सर्व सामाजिक, सहकारी संस्था, या ठिकाणी तिरंगा फडकविला जाणार आहे. यानिमित्ताने तरडोली येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती. या फेरीचे आयोजन मुख्याध्यापिका प्रतीभा कुतवळ, सहशिक्षीका कविता लवांडे , अंगणवाडीच्या तेजस्विनी जाधव, सुरेखा वाघ यांनी केले होते.
गावातील मुख्य रस्त्यावरून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली होती. प्रभात फेरीत विद्यार्थ्यांच्या घोषणांतुन हर घर तिरंगा हर मन तिरंगा या उपक्रमाचे उदबोधन करण्यात आले. घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले.