
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने खा. संजय राऊत यांचा सत्कार
Friday, April 7, 2023
Edit
बारामती - प्रतिनिधी
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने दैनिक सामना चे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांचा सत्कार पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष हेमंत गडकरी व सदस्यांच्या वतीने करण्यात आले.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व तालुकाध्यक्ष यांचा मेळावा कर्जत ( जि. अहमदनगर ) येथील दादा पाटील महाविद्यालय आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे खा. संजय राऊत होते. कर्जत जामखेड मतदार संघाचे कार्यक्षम आमदार रोहित पवार मेळाव्याचे स्वागताध्यक्ष होते.
बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका मराठी पत्रकार संघाचे सुमारे पंधरा सभासद या मेळाव्यासाठी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, कोषाध्यक्ष संदीप आढाव, तालुका सचिव सचिन पवार, ज्येष्ठ सभासद मनोहर तावरे, योगेश भोसले, राजेश बघ4, चिंतामणी क्षीरसागर उपस्थित होते.