उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्लॅस्टिक पिशवी बंदी ची घोषणा !
पुणे - निरा-बारामती वार्ता :- प्लॅस्टिक चा भस्मासुर वेळीच आवरला नाही तर अनेक समस्यांना तोंड देणं अवघड जाणार व पर्यावर्णाची ही अपरिमित हानी होत राहील हे लक्ष्यात घेऊन अजित पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे.आज पासून प्लॅस्टिक पिशवी मुक्त महाराष्ट्र हे अभियान सुरू करण्यात येत असून सर्व नागरिकांनी हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत अस त्यांनी म्हंटल आहे .प्लास्टिक चा वापर टाळून हे अभियान ही चळवळ यशस्वीपणे राबवली तर नक्कीच प्लॅस्टिक मुक्त महाराष्ट्र होईल. अस ही त्यांनी आज पुण्यात बोलताना सांगितलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी कृषी ITI ही संकल्पना राबवणार असल्याचं सांगत त्यातली एक संस्था पुणे जिल्ह्यात होणार असल्याचं सांगितलं आहे.
तरुणांचा कौशल्य विकास साधण्यास हे उपयोगी ठरेल अस ही त्यांनी म्हंटल आहे.हेरिटेज वास्तू व पर्यटन स्थळांच सौंदर्य वाढवून पर्यटन विकासाच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न ही करण्यात येईल.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी पुणे पोलिसांच्या कार्याच कौतुक केलं आहे.उल्लेखनीय कामगिरी मुळे पुणे पोलिसांचा ५राष्ट्रीय पातळीवर सन्मान होणे गौरवास्पद असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.जेष्ठ नाग रिक व बालकांच्या सुरक्षेसाठी भरोसा सेल तर आय टी मधील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका ही योजना यशस्वी पणे राबवली जात असल्याच ही त्यांनी ह्या वेळी म्हंटल आहे.