उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवथाळी नाकारली, म्हणाले
पुणे - गोरगरीबांना कमी पैशात जेवण मिळावे यासाठी शिवसेनेने शिवभोजन थाळीचा राज्यात उपक्रम सुरु केला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून या थाळीचे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 11 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ अजित पवारांच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील कॅन्टीनमध्ये करण्यात आला. मात्र, यावेळी त्यांनी शिवथाळी नाकारली.
शिवथाळी नाकारण्या मागचे कारण सांगताना अजित पवार म्हणाले, राज्यात आमची सत्ता येताच गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी आणणार असल्याचे शिवसेनेने घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार आज पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते या थाळीचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
पिंपरी चिंचवडमध्ये शिवभोजन थाळीचे उद्घाटन केल्यानंतर अजित पवार यांना थाळीची चव चाखण्यास सांगण्यात आले. त्यावर त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत थाळी नाकारली. ते म्हणाले की, मी जेवलो तर तुम्ही लगेच ब्रेकिंग चालवाल. अजित पवारांनी गरिबाच्या थाळीवर ताव मारला. तसेच मी इतक्या लवकर जेवत नाही. आरे मी दीक्षित डायटवर असल्याचे सांगितले. या शिवभोजन थाळीचा गरीब होतकरूंनी लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 11 ठीकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.