थोपटेवाडी गावात राजकीय हेव्यादाव्यापोटी सर्वसामान्य नागरिकांचा आवाज दाबला जातोय
थोपटेवाडी गावात आओ जावो, घर तुम्हारा
- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेले लॉक डाऊन व संचारबंदी कायदा, साथ रोग कायदा थोपटेवाडी(ता.पुणे) येथे पुरता धाब्यावर बसविण्यात आला आहे. गावात आपत्ती व्यवस्थापन समिती केवळ कागदोपत्री असून आजही अनेकजण इतर जिल्ह्यातून व तालुक्यातून ये जा करत असून सरपंच, ग्रामसेवक व इतर सदस्य कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे थोपटेवाडी येथे आओ जावो, घर तुम्हारा अशी परिस्थिती दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी गावात मुंबई,नाशिक येथून काही लोक गावात आले होते. त्यांना गावातील शाळेमध्ये विलगीकरणं केले आहे. त्यातील काहीजण झोपायला शाळेत जेवायला घरी मग विलगिकरण कशाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावात एक व्यक्ती हैदराबाद येथून आली त्या व्यक्तीच्या घरातील लोकांची राजकीय ओळख असल्यामुळे त्या व्यक्तीला घरी विलगिकरणात ठेवण्यात आले. त्यानंतर गावातील लोकांनी पोलिस पाटील यांना जाब विचारला असता ते म्हणाले मला पंचायत समिती उपसभापती ह्यांचा फोन आला होता म्हणून त्यास घरी विलगिकरण केले आहे. त्यामुळे अगोदर शाळेमध्ये विलगिकरणात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरातील नागरिक हैराण झाले असून एकाला एक नियम दुसऱ्याला एक नियम असा सवाल करत आहेत.
गावात राजकारण न करता सर्वाना सारखेच नियम करा अशी नागरिकांची मागणी आहे. गावामध्ये बारामती व पुणे येथून अनेकजण ये जा करत असताना त्यांना थांबविण्यात गावातील पदाधिकारी सपशेल अपयशी ठरले आहेत. तर कमेटी वरून गावात वाद चालू आहेत. कमेटी कडे गेले तर पोलिस पाटील म्हणत आहेत मी एकटा काय करू ग्रामपंचायत काहीच पाहत नाही.सरपंच यांच्या कडे गेले तर ते म्हणत आहेत माझा काही संबंध नाही तुम्ही कमेटी कडे जावा. एकीकडे कोरोना गावाच्या उंबरठ्यावर उभा असताना दुसरीकडे मतांची पोळी भाजून खाण्यासाठी कुणी कुणाला दुखवयाचे नाही असा नवा नियम कोरोना काळात घातला जात आहे.
गावात विस्तार अधिकारी आले असता त्यांनी या प्रकरणावर बीडीओ, तहसीलदार यांच्याशी बोलून उद्यापर्यंत तोडगा काढू असे सांगितले पण 2 दिवस अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
या सर्व प्रकरणाला गावातील तरुण आता पुरते वैतागले आहेत. पोलीस, महसूल, ग्रामविकास कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य असतानाही बाहेरील गाव, तालुका, जिल्ह्यातून लोक येत असून आपल्या परिवारात मिसळत असल्याने ही धोक्याची घंटा आहे.
बाहेरून ये जा करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचे प्रभावी उपाय हातात घेण्यासाठी समितीने कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.