-->
बारामतीत पोलीस आणि वकिलांमध्ये तुफान हाणामारी

बारामतीत पोलीस आणि वकिलांमध्ये तुफान हाणामारी

D.Y.S.P नारायण शिरगावकर यांच्यासह पोलिसांनाही वकिलांकडून मारहाण, पोलिसांनी देखील बचावासाठी केला लाठीचार्ज.


बारामती काल संध्याकाळी एका वकिलासह नाना सातव आणि अन्य कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या न्यायालयीन कामासाठी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. याचे एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करत होता त्याला वकिलांनी शूटिंग करण्यास मज्जाव केला आणि कोर्टाच्या आवारात बेकायदा शूटिंग करू नका असे सांगितले.
यावर पोलीस कर्मचाऱ्याने सदर वकिलास अरेरावीची भाषा वापरली. सदर बाब नारायण शिरगावकर यांना समजताच ते न्यायालयाच्या आवारात हजर झाले. यावेळी वकील राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर वकिलांची शिरगावकर यांना सदर बाब लक्षात आणून देत असताना चर्चेची पातळी घसरली आणि दोघांच्यात शिवीगाळ झाली. झालेल्या बाचाबाची नंतर त्याच पर्यावसन हाणामारी मध्ये झालं आणि दोन्ही बाजूने तुफान मारामारी झाली..
पोलिसांनी काही वकिलांना ताब्यात घेतले आहे मात्र अद्याप त्यांच्यावर कोणती कारवाई करण्याय आली आहे हे पोलिसांकडुन सांगण्यात आले नाही. मात्र या प्रकारानंतर वकील संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून पोलीस कायद्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे…
दरम्यान DYSP यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे बारामती वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


या प्रकरणा वरुन राडा झाला


शहरातील भिगवण रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरु असताना काल सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणावरुन भाजप नेते प्रशांत सातव यांच्यासह पाच जणांविरोधात बारामती शहर पोलिसांनी काल गुन्हा दाखल करुन अटक केली होती.


शिवाजी भानुदास जाधव (वय ३९, रा. सावतामाळीनगर, कसबा, बारामती), प्रशांत उर्फ नाना पांडूरंग सातव (वय ४९, रा. कसबा, बारामती) सुहास चंद्रकांत क्षीरसागर (वय ३२, रा. जगताप मळा, कसबा, बारामती), सागर राजेंद्र आगम (वय २३) व प्रसाद बाळासो आगम (वय २३, दोघे रा. श्रीरामनगर, कसबा, बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
भिगवण रस्त्यावर पंचायत समिती चौकाजवळील अब्दुलपूरकर इस्टेट येथे ही घटना घडली होती. याठिकाणी रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण काढण्याचे काम चालू असताना आरोपींनी तेथे काम बंद करण्याबाबत लोकांना चिथावणी देऊन बेकायदा जमाव जमवला आणि सरकारी कामकाजात अडथळा आणला. काम कसे सुरु करता ते बघतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी वरिल पाच जणांविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणण्यासह साथ रोग प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला होता.
आज त्यांना न्यायालयात हजर करत असताना सदर प्रकार घडल्याने बारामतीच्या शिस्तीला गालबोट लावण्यास कायद्याचे रक्षक पोलिस, आणि कायद्याचे जाणते वकिल यांनीच हरताळ फासला आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article