इंदापूर; नगरसेवक अनिकेत वाघ यांच्यामार्फत इन्फ्रारेड थार्मामिटरच्या साहाय्याने नागरिकांची तपासणी
Tuesday, May 12, 2020
Edit
इंदापूर (प्रतिनिधी) -आज जगावर ओढावलेले कोरोना महामारीच्या संकटात जवळपास सर्वच सामाजिक संस्थांनी मदतकार्याला सुरवात करून नागरिकांच्या मदतीला धाव घेतली आहे.
याच परीस्थितीत इंदापूर शहरातील राधिका सेवा संस्था व यश इन्स्टिट्यूट अँन्ड पाॅरामेडीकल सायन्सच्या माध्यमातून इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांची इन्फ्रारेड थार्मामिटरच्या साहाय्याने शरिरातील तापमाणाची तपासणी करण्यात आली.
शहरात राहणाऱ्या लहानांन पासून ते वृद्धांपर्यंतची तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेवक अनिकेत वाघ यांनी दिली.
तसेच इंदापूर शहरातून या उपक्रमाला प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळतो आहे व याच प्रतिसादामुळे जनतेतून कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे.