गुरुकुल सोसायटी, शिवनगर व्यक्तीच्या संपर्कातील आणखी 3 जणांना कोरोनाची लागण, एकूण 11 पॉझिटिव्ह
Thursday, July 23, 2020
Edit
काल एकूण ५९ स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते त्यापैकी ४२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत प्राप्त झालेल्या ४२ अहवाल पैकी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामध्ये काल पॉझिटिव्ह आलेल्या गुरुकुल सोसायटी शिव नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा तसेच जामदार रोड कसबा येथील रुग्णाच्या संपर्कातील तीन जणांचा व मुक्ती अपार्टमेंट कसबा येथील एक जणांचा, खंडोबानगर दत्त मंदिराजवळ येथील दोन जणांचा, मारवाड पेठ येथील एक जणांचा व ख्रिश्चन कॉलनीतील एक जणांचा असे ११अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.