बारामती ; आणखी 3 जणांना लागण, पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्याचा समावेश
बारामती तालुक्यातील काल पॉझिटिव्ह आलेल्या कन्हेरी येथील महिलेचा मृत्यू झालेला आहे तर आज शहरात नव्याने तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिनांक २१ रोजी घेतलेल्या एकूण ६९ स्वॅब नमुन्यांपैकी ४४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि उर्वरित २५ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामतीतील शहरातील कसबा येथील पस्तीस वर्षे वयाचा तरुण तसेच शहरातील ८५ वर्षाचा वृद्ध व गुरुकुल सोसायटी शिव नगर बारामती येथील ५४ वर्षे वयाच्या पुरुषाचा समावेश आहे.
तसेच काल पॉझिटिव्ह आलेल्या कन्हेरी येथील महिलेचा मृत्यू झालेला आहे.
कसबा येथील तरुणाचा पत्ता जामदार रोड कसबा बारामती असून शहरातील वृद्धाचा पत्ता वनवे मळा कचेरी रोड बारामती असा आहे.