कृषी पदवीधर संघटनेच्या वतीने दूध वाटून आंदोलन
बारामती :- देशातील आणि राज्यातील ७०% लोकसंख्या ही शेती आणि त्यासंबंधी व्यवसाय सोबत निगडित आहे. त्याच शेतकरी मायबापाचा आर्थिक कणा म्हणजे दुग्धव्यवसाय. पण गेल्या काही वर्षात त्याच दुधाला अगदी कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मायबाप आणि त्याचा दुग्धव्यवसाय पुर्ण मोड़कळीस आला आहे. माझ्या त्याच शेतकरी मायबापाच्या दुग्धव्यवसायाला चालना मिळावी आणि दुधाला योग्य तो भाव मिळावी यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. बाकीच्या संघटना कोणी दूध रस्त्यावर ओतुन देत आहे, कोणी दुधाचा टैंकर फोडत आहेत याने दुधाची नासाडी होत आहे. पण कृषी पदवीधर यूवाशक्ती संघटनेने दूध रस्त्यावर न ओतता तेच दूध शेतकऱ्यांकडून विकत घेऊन गोर गरीब आणि गरजू लोकांना वाटले.
संघटनेच्या बारामती शाखेच्या वतीने बारामती शहरातील बाल अनाथाश्रम मधे ५० लहान मुलांना साधारण २५ लीटर दूध उपलब्ध करून दिले. दुधामुळे लहान मुलांमधे प्रोटीन आणि व्हिटामिनचे प्रमाण वाढत असल्याचे मत अनाथाश्रमचे अध्यक्ष राजकुमार जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील चांदगडे , बारामती तालुकाध्यक्ष ओंकार खलाटे , उपाध्यक्ष सौरभ राऊत ,कार्याध्यक्ष सौरभ काटे देशमुख,प्रज्वल निगडे देशमुख आदी उपस्थित होते.