बारामती; कुरणेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष आणि कण्हेरी येथील 44 वर्षीय महिला पॉझिटिव्ह
Tuesday, July 21, 2020
Edit
कोऱ्हाळे बु||- बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे नजिक कुरणेवाडी येथील एक तर कण्हेरी येथील असे दोन जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
याबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल घेतलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या तीन नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती तालुक्यातील 2 दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यामध्ये कुरणेवाडी येथील ५८ वर्षे पुरुष व कन्हेरी येथील ४४ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आलेली आहे ,हे दोन्ही रुग्ण बारामती हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.