भिकोबानगर येथे एक पॉझिटिव्ह, तालुक्यातील संख्या 72 वर
आज सकाळपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार बारामतीतील भिकोबानगर येथील एका व्यक्तीस कोरोना ची लागण झालेली आहे. अर्थात 65 पैकी 63 निगेटिव्ह आहेत हा त्यातील दिलासा आहे.
बारामतीचे तालुुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल बारामती मधील कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील 65 नमुने तपासणीसाठी घेतले होते, त्यापैकी 63 निगेटिव्ह आलेले आहेत. येथील एक 64 वर्षीय पुरुष रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे व एक अहवाल प्रतीक्षेत आहे.
आत्तापर्यंत कोरोनामुळे बारामतीत तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे प्रशासन अधिक सावधानतेने उपाय योजना ऐकत आहे.होम क्वारंटाईन ची अंमलबजावणी अधिक कठोरपणे करण्याचे नियोजन आरोग्य प्रशासनाने केले असून यासंदर्भात शनिवारी बारामतीत बैठकही झालेली आहे पालकमंत्री अजित पवार यांनी अत्यंत गांभीर्याने वाढती कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या आहे.