पवार साहेबांकडून भगत कुटुंबियांचे सांत्वन
Friday, July 17, 2020
Edit
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र बापू भगत यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या को-हाळे बुद्रुक येथील निवासस्थानी आज राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भेट देऊन भगत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
1992 साली श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना काकडे गटाकडे होता तो रामचंद्र बापू भगत यांनी सभासदांच्या व पवार साहेबांच्या ताब्यात दिला.
पवार साहेबांनी कै. रामचंद्र बापू भगत यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 32 वर्षे संचालक व 10 वर्षे व्हाईस चेअरमन म्हणून सहकार क्षेत्रात केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला. ते पाऊण तास पवार साहेब भगत कुटुंबियांच्या घरी होते.
यावेळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सदाबापू सातव, प्रभुणे वकील, बापूंचे पुतणे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक सुनील भगत, विलास भगत, बन्सीलाल भगत, डॉ. यशवंत भगत, संजय भगत यांच्यासह भगत कुटुंबीय उपस्थित होते.