श्री सोमेश्वर देवस्थानची श्रावणी यात्रा रद्द
सोमेश्वरनगर - देशात उद्भवलेल्या कोरोना च्या साथी च्या पार्श्वभूमी वर बारामती तालुक्यातील करंजे येथील ऐतिहासिक सोमेश्वर मंदीराची यात्रा यंदाच्या वर्षी प्रथमतः रद्द करणेचा निर्णय विश्वस्त समितीने घेतला आहे .
विश्वस्त समिती अध्यक्ष विनोद भांडवलकर ,विश्वस्त ॲड गणेश आळंदीकर व सचीव सुनिल भांडवलकर यानी याबाबत माहीती दिली .
कोरोना च्या पार्श्वभूमी वर पुणे जिल्हाधिकारी यानी आपत्कालीन कायद्याच्या आधारे जिल्ह्यात लागु केलेल्या कायद्यानुसार कोरोना पासुन बचावासाठी सोशल डिस्टन्सींग रहावे संचार बंदीचे काटेकोर पालन व्हावे या हेतुने गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणुन देवस्थान समितीने तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष विनोद भांडवलकर ,विश्वस्त ॲड .गणेश आळंदीकर ,सचीव सुनिल भांडवलकर ,विश्वस्त सोमनाथ भांडवलकर ,प्रताप भांडवलकर ,प्रविण भांडवलकर ,शशीकांत मोकाशी ई विश्वस्त हजर होते .
दरम्यान यात्रेनिमित्त यंदा कोणतीही दुकाने चालु राहणार नसुन मंदीर प्रवेश जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार बंद आहेत. याशिवाय परंपरेप्रमाणे विधीवत पुजा अर्चा , सोमवतीचे पालखीचे स्नान सोशल डिस्टंसींग चे पालन करुन मास्क वापरुन सॅनिटायझर व्यवस्थेसह केले जाईल.गर्दी टाळण्यासाठी सोमवतीची पालखी यंदा निरा स्नानाठी गाडीमधे नेण्याचा निर्णय देखील घेणेत आला आहे.
संग्रहित छायाचित्र