-->
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उसाचे सोमेश्वर कारखाना करणार सर्वेक्षण

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या उसाचे सोमेश्वर कारखाना करणार सर्वेक्षण

कोऱ्हाळे बु - गेल्या ४-५ दिवसात सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात वादळी वा-यासह मोठा पाऊस झाला. या पाऊसामुळे  ब-याच ठिकाणी वाढलेले ऊस पडले असुन यामुळे सभासद शेतक-यांचे नुकसान झाले आहे. कार्यक्षेत्रात जो वाढलेलला ऊस पडला आहे त्याचे कारखाना विभागाच्या शेतकी खात्याकडुन पाहणी सुरु असुन याबाबतचा अहवाल शेतकी खात्याकडुन लवकरच मिळणार असुन हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.



             जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, कारखाना परीसरात वादळी वा-यासह झालेल्या पाऊसामुळे सभासद शेतक-यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले.याबाबत शासकीय कृषी विभाग व महसुल विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु आहे परंतु आपल्या शेतकरी बांधवांच्या झालेल्या या नुकसानीचे सर्वेक्षण करणे हे कारखान्याचेही कर्तव्य असल्याने कारखान्याच्या शेतकी विभागासही याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असुन याबबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेवु..जगताप पुढे म्हणाले की, येणारा हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीकोनातुन सर्व कामे
गतीने सुरु असुन आपणा सर्वांच्या सहकार्याने येणारा गाळप हंगामही यशस्वीरीत्या पार पाडु असा विश्वास आहे. त्याचसोबत तोडणी वाहतुकीचे करारही कारखान्यामार्फत झाले असुन अॅडव्हान्सदेखील दिला असल्याची माहिती पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article