-->
पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव परीसरात काल दि ६ रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने परीसरातील शेकडो हेक्टर उसाचे नुकसान झाले आहे . याचे  पंचनामे नोंद करुन  नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 



बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगांव ,तरडोली , सुपा , देऊळगाव रसाळ ,मुर्टी , आंबी , जोगवडी या परीसरात काल दि ६ रोजी सायंकाळी ७ ते रात्रभर  मुसळधार पाऊस पडला.पाऊस सुरु असतानाच वेगाने  वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या परीसरातील ऊस , कांदा , भूईमुग , बाजरी  या शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे .यामुळे शेतकऱ्यांचा  हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला आहे .



 मोरगांव परीसरात मोरगाव , तरडोली , मुर्टी ,  आंबी ,जोगवडी, लोणी भापकर  ,  देऊळगाव रसाळ  , सुपा आदी परीसरात गेल्यावर्षी लागण झालेला   आडसाली , पुर्व हंगामी तसेच  खोडवा , निडवा ऊस १६७४ हेक्टर जमीनीवर आहे .तर  यंदा  लागण झालेला आडसाली ऊस  ७०४ हेक्टर जमीनीवर आहे .



काल पडलेल्या पाऊस , गारा , सोसाट्याचा वारा यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . मोरगांव परीसरात आडसाली व यंदा लागण झालेल्या  ऊसाचे  वारा व गारांमुळे   लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . ऊसाबरोबरोच बाजरी  भूईमुगही जमीनदोस्त झाली आहे .


....................................................



 मोरगांव परीसरात  ऊसाचे झालेल्या नुकसानीबाबत   उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी  दखल घेऊन पंचनामे नोंद करण्याचे आदेश द्यावेत. बाधीतांना  नुकसान भरपाई द्यावी  .



सतीश जगदाळे : प्रगतशील शेतकरी मुर्टी 


.......................................................


सोमेश्वर सह साखर कारखाना सुरु झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांचे ऊसाची  तोड तात्काळ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे .


लालासो नलावडे  : संचालक सोमेश्वर सह . साखर कारखाना 


 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article