पाऊसामुळे थोपटेवाडी, कोऱ्हाळे, वडगांव परिसरातील पिके भुईसपाट
रविवारी 8 च्या सुमारास झालेल्या वादळी वारे आणि पावसामुळे थोपटेवाडी, वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे, होळ परिसरातल्या शेतातील ऊस, मका, बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वडगाव निंबाळकर येथील हनुमंत ढोले यांच्या शेतातील चार नारळाच्या झाडावर वीज पडल्याने जळाली.
थोपटेवाडीतील शिवाजी जाधव, रामचंद्र वाघ, तर वडगांव मधीलविजय शिंदे विजय हिरवे शरद टेंबरे नितीन हिरवे अशोक हिरवे यांच्या शेतातील बाजरी भुईसपाट झाली आहे. थोपटेवाडीतील रामचंद्र वाघ, शिवाजी जाधव, कोऱ्हाळे बुद्रुक येथील सत्यवान माळशिकारे अजित माळशिकारे, आनंदराव माळशिकारे, गुलाब कचरे, महादेव पडळकर, भरत पवार यांच्या शेतातील ऊस पीक पाऊस आणि वाऱ्यामुळे झोपले आहे.
दोन- तीन गावांमधून सुमारे 200 हेक्टर ऊस पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज डिजी माळशिकारे यांनी वर्तवला आहे. शासनाच्या वतीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.