बारामती, ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त
बारामती : बारामती तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तालुक्यात सात दिवस जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती – फलटण रस्त्यावर सातारा सीमेवर बारामती ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
सध्या सांगवी गावात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली यासाठी ग्रामपंचायतीने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मास्क न वापरणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे, व वाहन परवाना नसलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. बारामती ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांत वाहनांवर केलेल्या कारवाई दरम्यान जवळपास ५० हजारांच्या आसपास दंडाची रक्कम वसूल केली आहे. फलटण कडून बारामतीच्या दिशेला व बारामतीहून फलटणच्या दिशेला जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करून सोडण्यात येत आहे.
यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ईसमांनी चांगलाच धसका घेतला आहे. गेली सात महिन्यांपासून लॉकडाऊन लॉकडाऊन काळात बारामती ग्रामीण पोलीस बारामती फलटण रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. यावेळी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस हवालदार जयंत ताकवणे, पोलीस हवालदार रमेश साळुंके, अनिल खेडकर, पोलीस नाईक रमेश नागटिळक, नितीन चव्हाण, होमगार्ड अविनाश वाघमोडे यांनी ही कारवाई करत आहेत.