वाणेवाडी च्या डॉ.रवींद्र सावंत यांची यशस्वी यशोगाथा
*जिद्द , मेहनत व चिकाटीच्या जोरावर दुध उत्पादनात अव्वल स्थानी !!* *वाणेवाडी च्या डॉ.रवींद्र सावंत यांची यशस्वी यशोगाथा.*
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील वाणेवाडी ( ता.बारामती ) येथील डॉ. रविंद्र सावंत हे जागतिक दर्जाचे दूध उत्पादन करणारे पहिले व्यक्ती आहेत.
डॉ. रवींद्र सावंत यांनी बारावी नंतर वेटरनरी चा डिप्लोमा केला आहे. त्यानंतर त्यांनी १२ ते १३ वर्ष वेटरनरी प्रॅक्टिस केली. ती प्रॅक्टिस करत असताना त्यांच्या लक्षात आले की जे शेतकरी गाई म्हशी पाळतात त्यांची त्यातून प्रगती झाली नाही. त्यानंतर डॉ. यांना या क्षेत्रात काहीतरी बदल केला पाहिजे असे वाटले आणि त्यांनी त्यासाठी डॉक्टर की सोडली आणि स्वतःचा 50 गायांचा डेअरी फार्म वाकी येथे उभा केला.
यानंतर डॉ. यांनी दूध व्यवसायात अवरेज कसं वाढेल, गायांचे आजार कसे कमी होतील, यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. 2011 वेळी यांच्याकडे शंभर गायी आणि 40 कालवडी होत्या. नेमके त्याच वेळी सकाळ पेपर मध्ये एक बातमी आली भारतातील कुठल्याही इंडिव्हिजन फार्म चे दुध अमेरिका इस्रायल च्या दुधाच्या सुद्धा उभे राहू शकणार नाही, जवळपासचा तर विषय सोडून द्या. आणि हेच चॅलेंज त्यांनी उचलले आणि क्वालिटी दूध बनवण्यास सुरुवात केली.
कॉलिटी दुध बनवण्यासाठी त्यांनी जुलै 2013 पासून वेगवेगळ्या टेस्ट घ्यायला सुरुवात कॉलिटी दूध म्हणजे (अँटिबायोटिक फ्री रोमॅण्टिक सेल अकाउंट हेवी मेटल फ्री बॅक्टेरियल काउंट स्टॅंडर्ड) पोझिशनला आणले. अशा प्रकारचे दूध बनवण्यात डॉक्टर सावंत हे 2013 च्या वर्ष समाप्ती वेळी क्वालिटी दूध बनवण्यात यशस्वी झाले. आणि १ जानेवारी २०१४ पासून त्यांचे दूध डायनामिक्स कंपनीला जायला लागले. तेव्हापासून त्यांनी काही टेस्ट पॉझिटिव्ह येऊन दिली नाही त्यासाठी त्यांनी काळजी घेतली.
डॉ.सावंत यांच्या डेअरी फार्म वर अनेक लोकांनी भेट दिली. त्यात पवार साहेब व त्यांचे सर्व कुटुंब महाराष्ट्रातील आजी-माजी नेते , जवळपास देशातील सत्तर टक्के लोक फार्म पाहून गेलेत. तसेच MacDonald, denald, Nesale, pizzzahut,amul dairy यासारख्या अनेक कंपनीचे चेअरमन या फार्म वर भेट देत असतात.
आतापर्यंत डॉक्टर सावंत यांनी 245 माणसांच्यात 10 गायन पासून 500 गायांचा डेरी फार्म उभा करून दिला आहे. मालेगाव ,नाशिक च गोदरेज कंपनी ला सहकार्य केले आहे.
डॉक्टर रवींद्र सावंत यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अपेक्षित त्यांना दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान, बारामती गौरव पुरस्कार, महाराष्ट्र पशू विद्यापीठ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नेदरलॅंडचे पंतप्रधान मंत्री, कृषी मंत्री यांच्यासमोर डॉक्टर सावंत यांचे प्रगतशील डेरी फार्म चे प्रेझेन्टेशन झाले आहे.
आत्ता सध्या त्यांच्याकडे लहान मोठ्या शे गाय आहेत. एक गाय दिवसाला सरासरी 20 ते 22 लिटर दूध देते. दिवसाचे सहा हजार लिटर दूध तयार होते.
याच बरोबर डॉक्टर सावंत मी फार्म मॅनेजमेंट उच्च लेवल केला आहे. गायन लागणारे पशुखाद्य सुद्धा तेच बनवतात. मध्ये अठरा प्रकारचे वेगवेगळे घटक असून ते गायन साठी खूप चांगल्या प्रकारचा आहे. तसेच त्यांच्याकडे ऑटोमॅटिक मिल्किंग पार्लर आहे. आणि ट्रेनिंग सेंटर आहे
डॉक्टर सावंत यांचे त्रिमूर्ती डेअरी मार्ट वाघळवाडी व बारामती तालुका येथे आहे. तिथे दूध व्यवसायात लागणारे सर्व मशीन मिळतात. त्यांचे दूध मुंबई पुणे याठिकाणी बॉटल व पाऊच यामध्ये विकले जाते.
सिद्धी सतीश सकुंडे . वाघळवाडी -सोमेश्वर नगर बारामती