-->
माझे कुटुंब माझी जबाबदारी उपाय योजनेचा दुसरा टप्पा सुरु - डॉ.मनोज खोमणे

माझे कुटुंब माझी जबाबदारी उपाय योजनेचा दुसरा टप्पा सुरु - डॉ.मनोज खोमणे

कोऱ्हाळे बु-  बारामती शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आजपासून म्हणजे दिनांक 14/10/20 ते 24/10/ 20 पर्यंत राज्य शासनाने सुरू केलेल्या "माझे कुटुंब माझी जबाबदारी "या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे,या अंतर्गत सर्व नागरिकांची आरोग्य कर्मचाऱी, आशा,अंगणवाडी सेविका, शिक्षक व स्वयंसेवकांच्या टीम मार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करावे व आपली तपासणी करून घ्यावी व कोरोणा सदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ आपली एंटीजेन तपासणी करून घ्यावी तसेच जरी कोरोणाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी सुद्धा धोका अजून टळलेला नाही त्यामुळे आपण सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे व सर्वांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा  वापर करणे व सोशल डिस्टंसींग  पाळणे या बाबी अंगीकारून कोरोणाला दूर ठेवण्यास मदत करावी,अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली.



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article