सकाळपासून सुरू असलेला पाऊस थांबायचे नावच घेईना !
कोऱ्हाळे बु- चार दिवसांत राज्यभरात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरूणराजाने आज बारामतीत देखील पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केले.आज सकाळ पासूनच संपूर्ण बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली आहे.त्यामुळे बारामतीतील काही मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
सकाळपासून सुरू असलेला हा पाऊस अद्याप पर्यंत देखील काही थांबायचं नाव घेत नसल्यामुळे अनेक नागरिक आज आपल्या घरीच अडकून पडले आहेत.सकाळपासून सुरू असणाऱ्या या पावसामुळे आज बारामतीतल्या बाजार पेठेत देखील शुकशुकाट पाहायला मिळाला.एकंदरीतच सकाळ पासून सुरू असणाऱ्या ह्या पावसामुळे अनेकांची दैनंदिन कामे खोळंबली असून बारामतीत जनजीवन हे काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचे देखील पाहायला मिळाल.