कांद्याच्या पट्टीची रोख रक्कम चोरी करणाऱ्या ट्रक चालकास अटक
वडगांव निंबाळकर- गिरीम ता.दौड या परीसरातील शेतकऱ्यांनी २१० पिशवी कांदा माल एकत्र करून तो मार्केट यार्ड कोल्हापुर येथे विकण्यासाठी ट्रक न.एम.एच .१३ आर २७२७ मधुन ट्रक ड्रायव्हर नामे शिवाजी बाळासाहेब ठोबरे रा गिरीम ता.दौंड जि पुणे याचे ताब्यात देवुन त्यास मार्केट यार्ड कोल्हापुर येथे माल विक्रीसाठी पाठविले होते.त्याचेसोबत शेतकरी शिवाजी तलवार, गुलाब घुले असे दोघेजण गेले होते.कांदा विकी झालेनंतर दोन्हीही शेतकरी परत गिरीम येथे आले व कादंयाची पटीची रक्क्म ही ड्रायव्हर नामे शिवाजी बाळासाहेब ठोंबरे रा गिरीम ता दौड जि.पुणे यांस आणणेस सांगितले होते.
दि १७/१०/२०२० रोजी रात्रौ ० ९ / ४५ वा सुमा चालक शिवाजी बाळासाहेब ठोंबरे रा गिरीम ता दौंड जि.पुणे याने फोन करून संतोष घुले यांना तसेच पोलीसांना फोन करून कळविले की ल, निरा ते मोरगाव रोडने येत असताना माझे ट्रकला एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीने थांबवुन त्यातील चार इसमांनी खाली उतरून ट्रकचे काचेवर दगड मारून गाडी थांबवुन गाडीत येवुन मला मारहाण करून माझे जवळील कांदयाची पट्टी रोख रक्कम रूपये ३,५९,४८६ रू व मोबाईल जबरदस्तीने घेवुन निरा बाजुकडे गेले आहेत. सदरची माहीती ही पोलीस ठाण्यास मिळताच तत्काळ मा . श्री अभिनव देशमुख सो , पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा . श्री मिलींद मोहीते , अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग , मा.श्री नारायण शिरगावकर , उपविभागीय पोलीस अधिकारी , बारामती विभाग बारामती , तसेच पोलीस निरीक्षक श्री पद्माकर घनवट सो , यांनी आदेश देवुन संपुर्ण पुणे जिल्हयात तसेच लोणंद येथे नाकाबंदी नेमुन सदरचे स्कॉर्पिओ गाडीचा शोध घेण्याचा आदेश दिला होता तसेच पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.सोमनाथ लांडे , पो.स.ई कवितके , चालक सहा फौजदार जाधव, पोका खान , पो.कॉ सांळुके व इतर स्टाफ असे तात्काळ घटनास्थळावर गेले. घडले पटनेबाबत ट्रक चालक शिवाजी बाळासाहेब ठोबरे रा.गिरीम ता.दौंड जि.पुणे याचेकडे चौकशी केली असता त्याने वरीलप्रमाणे हकीकत सांगितले त्यांनतर परीसरात पोलीस स्टाफ मार्फत, गावोगावी काळे रंगाचे स्कार्पिओ व त्यातील इसमाबाबत माहीती घेतली. तसेच लोणंद निरा मार्गावरील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. परंतु सदर वर्णनाची स्कॉर्पिओ गाडी कोठेच दिसुन आली नाही तसेच टक डायवर हा दुपारी कोल्हापुर येथुन निघाल्याचे सांगत होता त्याला पोहचायला खुप वेळ लागल्याने व कोठेही सदर वर्णनाची गाडी दिसत नसल्याने ट्रक चालक हा खोटे बोलत असल्याचा संशय आल्याने त्याचेकडुन कसुन चौकशी केलेवर व ट्रकची पाहणी केलेवर त्याचे ट्रकचे केबीनमधील साउंड बॉक्समध्ये कांदयाची पट्टीचे रोख रक्कम रूपये ३,५९,४८६ रू व त्याचा वापरता मोबाईल हा मिळुन आला. त्याने स्वतःच सदर पैसे व मोबाईल लपवुन ठेवुन जबरी चोरी करून चोरांनी पैसे चोरल्याचा बनाव केल्याचे उघडकीस आले त्यानंतर त्याचेकडे चौकशी करता त्याने स्वतःच पैसे व मोबाईल लपवुन ठेवल्याचे व स्वत : च ट्रकची काच फोडुन जबरी चोरी झाल्याच बनाव केल्याचे कबुल केले . त्याबाबत त्याचेवर वनिपो.स्टे गु.र.न ४८३/२०२० भादवि ४०७ अन्वये गुन्हा दाखल करणेत आला असुन , त्यास गुन्हयाचे कामी अटक करणेत आली आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.स.ई कवितके हे करीत आहे . सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक , अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण , अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते साो , बारामती विभाग बारामती , तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सो , नारायण शिरगावकर , बारामती विभाग बारामती , श्री.पद्माकर घनवट निरीक्षक , स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा ग्रा . याचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि श्री.सोमनाथ लांडे , पो.स.ई श्रीगणेश कवितके, चालक सहा फौजदार जाधव , पो.काँ खान , पो.कॉ साळुके, पो.कॉ पिसाळ , होम कुंभार होम गरूड , तसेच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाकडील पो.स.ई गोरे, पो. हवा अनिल काळे, पो.हवा. रविराज कोकरे, पो.हवा.शिरसट व इतर स्टाफ यांनी केलेली आहे.