राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांत पडणार पाऊस
पुणे : महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी वातावरण तयार होत आहे. पुढील काही दिवस राज्यात पुन्हा मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
बंगालच्या उपसागरात नऊ ऑक्टोबरला कमी दाबाच्या क्षेत्र झाले होते. त्यानंतर उद्या (ता.१९) पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. बंगाल उपसागराचा पश्चिम भाग व व आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ते पुन्हा अरबी समुद्र दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात पाऊस वाढणार आहे. उद्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात विजांसह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.
सध्या राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे. त्यातच अरबी समुद्राकडे गेलेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते ओमानकडे सरकले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा प्रभाव कमी झाला. अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. परंतु, राज्यात काही प्रमाणात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाची स्थिती कायम राहणार आहे.
येथे पडणार जोरदार पाऊस ः
सोमवार : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड,
लातूर, उस्मानाबाद.
मंगळवार : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी,
हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.
बुधवारी : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, लातूर,
उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.