-->
रस्ते अपघात झाल्यास होणार मोफत उपचार; बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस प्रारंभ

रस्ते अपघात झाल्यास होणार मोफत उपचार; बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेस प्रारंभ

कोऱ्हाळे बु -   राज्यात रस्ते अपघातातील गंभीर जखमींना गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना संपूर्ण राज्यात राबवण्यास आजपासून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत जखमींवर पहिल्या 72 तासांमध्ये पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येतील. वेळेतील उपचारांमुळे रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.


     


पहिल्या 72 तासांत संपूर्ण मोफत उपचार


रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात दाखल करून उपचार मिळाल्यास मृत्युचे प्रमाण कमी होते. जखमी व्यक्तीच्या मेंदुला इजा झाली असल्यास ऑक्सीजन पुरवठा करून पूर्ण काळजी घेऊन रुग्णालयात दाखल केल्यास मेंदूची इजा कमी होण्यास मदत होईल. रक्तस्त्राव होत असल्यास रक्त पुरवठा केल्यास जखमीचे प्राण वाचतील. त्यामुळे जखमी व्यक्तीला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मागील महिन्यातील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आज शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे ही योजना राज्यात राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील कोणत्याही रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या जखमीला या योजनेत वैद्यकीय उपचार मिळतील, मात्र औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरात घडलेले अपघात व रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही


तर कारवाई…


रस्ते अपघात वीमा योजनेत जखमींवर उपचार नाकारल्यास किंवा कमी दर्जाची वैद्यकीय सेवा दिल्यास संबंधित रुग्णालयावर कारवाई होणार आहे.


योजनेचे फायदे



  • रस्ते अपघातातील जखमीवर पहिल्या 72 तासांमध्ये मोफत उपचार

  • प्रत्येक रुग्णामागे 30 हजार रुपये वीमा कंपनीकडून अंगिकृत रुग्णालयात दिले जातील

  • 108 योजनेतील रुग्णवाहिका सेवा उपलब्ध नसल्यास पर्यायी रुग्णवाहिकेसाठी एक हजार रुपये वीमा कंपनीमार्फत देणार

  • कोणते उपचार होतील

  • रक्तपुरवठा थांबवणे, जखमेला टाके, अति दक्षता व वाँर्डमध्ये उपचार

  • अस्थीभंग, डोक्याला लागलेला मार मणक्याला झालेली दुखावत, जळल्यामुळे झालेल्या दुखापतीवर उपचार

  • रक्त पुरवठा व प्लाझ्मा पुरवठा

  • डॉक्टरांनी सुचवलेल्या विविध तपासण्या व औषधोपचार


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article