जि.प.सदस्या रोहिणी तावरे यांच्या हस्ते विजयादशमीच्या मुहूर्तावर विविध विकासकामांचे भूमिपूजन
माळेगाव (वार्ताहर) - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या माळेगाव बुद्रुक-भोईटे मळा- पवईमाळ- कठीण पूल रस्ता (लांबी 12 किलोमीटर)( रक्कम 11 कोटी 85 लक्ष रुपये) या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ पवईमाळ येथे आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जिल्हा परिषद सदस्या सौ रोहिणी रविराज तावरे (लाखे) व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री तानाजी काका कोकरे यांच्या शुभहस्ते व माळेगाव कारखान्याचे संचालक स्वप्निल अण्णा जगताप, दूध संघाचे चेअरमन संदीप पाटील जगताप,पंचायत समिती सदस्य रोहित कोकरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोकराव मुळीक, पवईमाळ चे सरपंच अतुल जगताप, रविराज तावरे, उपसरपंच मयूर कदम,माऊली कोकरे ,रोहिणी कुंभार, वैशाली पन्हाळे ,सुरेश काका जगताप, श्रावण कांबळे,सचिन नलावडे,ज्ञानदेव बापू कदम, बबनराव कुंभार ,रावसाहेब श्री नितिन शेडगे यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी पवईमाळ येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या व मास्क चे किट जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या वतीने सरपंच श्री अतुल जगताप यांच्याकडे देण्यात आले.