उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
मुंबई : राष्ट्रवादीचे (national congress party) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (breach candy hospital) दाखल करण्यात आले आहे.
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली आहे.
तसंच, राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन' अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागली होती. पण, कोरोनाची चाचणीही निगेटिव्ह आली होती. पण, खबरदारीचा उपाय म्हणून 22 ऑक्टोबरपासून अजितदादांनी स्वत: क्वारंटाइन केले होते. पण, आज अजित पवारांना आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अजितदादांच्या कुंटुबातील इतर कोणत्याही सदस्याला कोरोनाची लक्षणे नाहीत. त्याचबरोबर अजित पवार यांच्या छातीचा सीटी स्कॅनही करण्यात आला होता. दोन दिवसांआधी खबरदारी म्हणून ही टेस्ट केली होती, रिपोर्ट हा नॉर्मल आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मागील आठवड्यात अजित पवार यांना अचानक ताप आणि थंडी भरून आली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजितदादांनी स्वत: होम क्वारंटाउन होण्याचा निर्णय घेतला होता. ताप आणि थंडी जाणवू लागल्यामुळे अजितदादांनी आपले सर्व कार्यक्रम हे रद्द केले आहे. राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यक्रमांना अजितदादा हे अनुउपस्थिती होते. काही कार्यक्रमांना त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती.