-->
पळशी येथील सराफ व्यावसायीकाला लुटले, बारा तोळे सोनं लंपास

पळशी येथील सराफ व्यावसायीकाला लुटले, बारा तोळे सोनं लंपास

पळशी (ता.बारामती) येथील सराफ व्यावसायिकाला भर रसत्यात सोमवारी संध्याकाळी चेहऱ्यावर कापडा टाकत लुटले. सोने, चांदिच्या व्यावसायीकाच्या बँग मधिल बारा तोळे सोने पलसर मोटारसायकल वरून लंपास केले आहे. तीघा चोरट्यांनी मोटरसायकल वरुन पलायन करताना मुर्टी येथे रस्ता रोखणाऱ्या युवकांना बंदूकीचा धाक दाखवत चौधरवाडीच्या वनविभागाच्या क्षेत्रात पलायन केल्याचे स्थानकांनी सांगितले. वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पळशी (ता.बारामती) येथे नवयानेच सोने चांदीच्या दागिन्यांच्या सराफ व्यावसायिक संध्याकाळी दुकान बंद करून पळशी येथून मोरगावकडे दुचाकीवरून निघाले होते. ओसाड माळरानावर आधीच दबा धरुन बसलेल्या तिघांनी अचानक व्यावसायीकाच्या अंगावर कापड टाकले, त्या कापडात मिरचीची पुड ही होती. त्यामुळे व्यावसायिकाच्या डोळात जळजळ झाल्याने ते गडबडले व तिघा चोरट्यांनी व्यावसायीका जवळची बँग पळवली. तिघे चोरटे लाल-काळ्या रंगाच्या पलसर दुचाकीवरून नीरेच्या दिशेने जात असताना, मुर्टीतील काही युवकांनी त्यांन अडवण्याचा प्रयत्न केल असता, चोरट्यांनी बंदुकीचा धाक दखवत पलायन केले. मुर्टीतील युवकांनी वडगाव निंबाळकर पोलिसांना या घटनेची कल्पना देताच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी तातकाळ जेजुरी, नीरा, मोरगाव पोलीसांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले.



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article