
मोरगाव : सोमवती अमावस्या निमित्त मयुरेश्वराचा पालखी सोहळा संपन्न
Monday, December 14, 2020
Edit
मोरगाव : अष्टविनायक प्रथम स्थान मोरगाव ता.बारामती येथे आज सोमवती अमावस्या निमित्त मयुरेश्वराचा पालखी सोहळा निघाला होता . कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे काही निवडक पुजारी , ग्रामस्थ व माणकऱ्यांच्या उपस्थितीत मोरया मोरयाचा जयघोष करीत हा सोहळा कऱ्हानदी काठी पोहचला . यानंतर श्रींना जलस्नान घालण्यात आले.
आज दि .१४ रोजी सोमवती अमावस्या निमित्ताने मयुरेश्वराचा पालखी सोहळा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मंदिरांमधुन निघाला होता .प्रत्येक सोमवती आमावसेला शेकडो भावीक भक्त श्रींच्या जलस्नासाठी उपस्थित असतात मात्र कोरोनामुळे मोरयाचे काही निवडक मानकरी, ग्रामस्थ ,पुजारी उपस्थित होते. अबदागिरी ,छ्त्री ,व मोरया मोरया चा जयघोष करत पालखी नदीकाठी गेली . नदीपात्रात हा स्नान सोहळा तब्बल एक तास सुरु होता . उपस्थित मानकऱ्यांना चंदनाचा टिळा व साखरेचा प्रसाद देण्यात आला.
यानंतर मंदिराकडे हा सोहळा मयुरेश्वरा चा नामघोष करत पुन्हा मंदिरा समोरील मुख्य पेठेतून सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आला .यावेळी मयुरेश्वर दर्शनासाठी आलेल्या भावीक भक्तांनी सोशल डिस्टन्सचा अवलंब करीत पालखीचे दर्शन घेतले . जेजुरी येथे संचारबंदी असल्याने तेथील भक्तांचा ओढा मोरगांव येथील मयुरेश्वर मंदिराकडे वळला असल्याने भावीकांची मंदीयाळी जाणवत होती .
...........................................................................
कऱ्हा स्नानानंतर दर सोमवती अमावस्येला पालखी सोहळा मंदिरात प्रवेश करताच मुख्य प्रवेशद्वाराच्या वरून श्रींच्या पालखी वर खारीक, खोबरे,शेंगदाणा, साखरफुटाणे, खडीसाखरेची उधळण करण्यात येते . मात्र कोरोनामुळे या प्रसादाची उधळण करण्यात आली नाही . तसेच तोफांची सलामीसुद्धा देण्यात आली नाही
कऱ्हा स्नानासाठी श्रींचा पालखी सोहळा जाताना