
ग्रामपंचायतीचे सदस्यच ठरवणार आपल्या गावचा सरपंच कोण?
Tuesday, December 15, 2020
Edit
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर लागलीच जनते मधला सरपंच ही संकल्पना सरकारने रद्द केली आणि ग्रामपंचायतीचे सदस्य आपला सरपंच निवडतील अशी तरतूद केली.
मात्र त्यानंतरही अनेक वावड्या उठत राहिल्या. आता ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्यानंतर देखील, काही ठिकाणी अशा प्रकारचे समज आहेत, मात्र येणाऱ्या निवडणुकीत ग्रामपंचायतीचे मतदार प्रभागातील आपला सदस्य निवडतील आणि आलेल्या सदस्यांमधून सरपंच कोण निवडायचा हे सदस्य ठरवतील!
राज्यातील 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत. 15 जानेवारी 2021 रोजी नव्या कारभाऱ्यांना साठी या सर्व ग्रामपंचायतींचे मतदार मतदान करणार आहेत. अशा स्थितीत राज्यभरातील सर्व तालुक्यांमधील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण ही जाहीर झालेले आहे.
तरीदेखील मध्यंतरीच्या काही अफवांमुळे सरपंच सदस्यांमधून निवडले जाणार की जनतेमधून याविषयी चर्चा अजूनही सुरू आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सरपंच हा सदस्यांमधून निवडला जाईल ह्याचा स्पष्ट केले असल्याने सरपंच पदाबद्दलचा सामान्य नागरिकांमध्ये गैरसमज दूर होण्यास मदत होईल.