
वडगाव निंबाळकरमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
Sunday, January 3, 2021
Edit
वडगांव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरा मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १७९ वि जयंती साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या फोटो चे पूजन व दिप प्रजोलीत कु. प्रतीक्षा पवार यांनी केले व फुले यांच्या चारित्र्यावर पवार व ईश्वरी शिंदे यांनी भाषण केले, रोहिदास हिरवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हनुमंत बनकर, रघुनाथ आगम, विजय हिरवे, सुनिल ढोले, महादेव शिंदे, हनुमंत खोमणे, दत्ता बनकर, राजाराम लोणकर, दादा शेंडे व अनिकेत हिरवे इतर मान्यवर उपस्थित होते.