-->
तरडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ जगदाळे तर उपसरपंचपदी महेंद्र तांबे

तरडोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नवनाथ जगदाळे तर उपसरपंचपदी महेंद्र तांबे

मोरगांव : तरडोली ता. बारामती ग्रामपंचायत निवडणूकीनंतर आज झालेल्या सरपंच पदाची  निवड  संपन्न  झाली. यामध्ये  काळभैरवनाथ विकास पॅनलचे नवनाथ जगदाळे यांची सरपंचपदी निवड झाली. तर किसन तांबे यांच्या श्री नाथसाहेब  ग्रामविकास पॅनलचे महेंद्र  जिजाबा तांबे यांची उपसरपंचपदी निवड झाली.
         तरडोली येथील ग्रामपंचायत पंचवार्षीक निवडणूकीनंतर चार पॅनलाला नऊ जागा मिळाल्या होत्या . कोणत्याच पॅनलला  बहुमत नसल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. आज आरक्षण पद्धतीने  सरपंच पदाची निवड  पार पडली.   यामध्ये सरपंच पदासाठी नवनाथ जयसिंग जगदाळे व विद्या हनुमंत भापकर या दोहांचे अर्ज आले. यानंतर जगदाळे यांनी  गुप्त  मतदानाची मागणी  निवडणूक निर्णय अधीकारी बाजीराव सूर्यवंशी यांकडे  केली. यावेळी ग्रामसेविका रुपाली म्हेत्रे, गावकामगार तलाठी श्याम झोडगे  उपस्थित होते .या गुप्त मतदान प्रक्रीयेत  नवनाथ जयसिंग जगदाळे यांना ४ मते,  विद्या हनुमंत भापकर यांना ३  मत प्राप्त  झाले. तर   दोन मतदान बाद झाले.

        यामुळे मतांच्या  संख्येनुसार नवनाथ जयसिंग  जगदाळे यांची सरपंचपदी निवड घोषित करण्यात आली. यानंतर उपसरपंच पदाच्या निवडीत सागर पंडीत जाधव व महेंद्र जिजाबा  तांबे  या दोघांनी अर्ज दाखल केले. हे ही मतदान गुप्त पध्दतीने पार पडले. नऊ पैकी एक मतदान बाद झाल्यामुळे जाधव व तांबे यांना समसमान प्रत्येकी चार  मतदान पडले. यानंतर ईश्वर चिठ्ठी पद्धतीने  महेंद्र जिजाबा तांबे यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांना उपसरपंच पदी घोषित केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article