
पणदरे खिंड येथे वडगाव पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई: ५ हजारांचा दंड वसुल
Saturday, February 13, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमार्फत आज वाहतुक पोलिसांकडून पणदरे खिंड येथे 25 वाहनचालकांवर कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
यामध्ये गाडीची कागदपत्रे नसणे, लायसन्स नसणे, इन्शुरन्स नसणे, पियुसी नसणे, गाडी चालवताना फोनवर बोलणे, बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. हि कारवाई एपीआय सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस बाळासो पानसरे, पो. नाईक अनिल खेडकर, पो. नाईक खोमणे, पो. नाईक लोखंडे यांनी केली.