
मयुरेश्वर आय.सी.यु.हॉस्पिटल या कोवीड केंद्रामध्ये केवळ पाच तास पुरेल एवढा ऑक्सीजन शिल्लक, मदतीचे आवाहन
Wednesday, April 21, 2021
Edit
मोरगाव : मोरगाव ता बारामती येथील मयुरेश्वर आय.सी.यु.हॉस्पिटल या कोवीड केंद्रामध्ये केवळ पाच तास पुरेल एवढा ऑक्सीजन शिल्लक आहे. येथील रुग्णांच्या नातेवाईकांना पुर्व सुचना देऊन रुग्णांस ईतर ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड पहायला रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगितले आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
येथील मयुरेश्वर हॉस्पिटल कोवीड केंद्रामध्ये ४२ रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. पैकी १२ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. हॉस्पिटलला उपलब्ध ऑक्सीजन केवळ चार ते पाच तास टीकेल एवढाच शिल्लक असल्याची माहीती हॉस्पिटलचे डॉक्टर पवार यांनी सांगितले. ऑक्सीजन उपलब्ध करुन मिळणेबाबत बारामती प्रांताधीकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी हॉस्पिटल व्यवस्थापनाने संपर्क साधला आहे.
मोरगाव येथील वेल्डींग व्यवसाय करणाऱ्या व्यवसाईकांस ऑक्सीजन सिलेंडर शिल्लक असल्यास मदत करण्याचे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे. ऑक्सीजन मिळण्यासाठी शासन व खाजगी पातळीवर या कोवीड सेंटरकडुन प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र कोठेही ऑक्सीजन उपलब्ध न झाल्यास रुग्णांना ईतर ठिकाणी अधीक उपचारासाठी हलवावे अशी पूर्वसूचना दिली असल्याने नातेवाईक व रुग्ण धास्तावले आहेत.