
८ महिन्यांपासून फरारी असलेल्या सराईत गुन्हेगाराला वडगाव निंबाळकर पोलीसांनी घेतले ताब्यात
Monday, April 26, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- दौंड पोलीस स्टेशन हदीत किशोर उर्फ किश्या रमेश मोरे रा.लांडगोबामाळ मुरुम ता.बारामती जि.पुणे याने इतर आरोपींच्या मदतीने दौड पोलीस स्टेशन गुर नं-४२१/२०२० भा.द.वि ३९५,३९४,३९७ या प्रमाणे गभीर गुन्हा करुन मागील ८ महीन्यांपासुन फरारी झालेला होता . आज रोजी तो वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील तळवणीनगर मुरुम ता.बारामती जि.पुणे परीसरात तो येणार असलेबाबत खात्रीलायक गोपनीय माहीती मिळाल्याने तळवणीनगर मुरुम ता.बारामती परीसरात आज रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन पोलीस पथकाने सापळा रचुन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता सराईत गुन्हेगार किशोर उर्फ किश्या रमेश मोरे याला पोलीस त्याचे मागावर असलेची चाहुल लागलेने पळुन जात असताना त्याचा पाठलाग करुन वडगाव निंबाळकर पोलीस पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतलेला आहे.
यापुर्वीचे कालावधीत त्याचे विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये १) गु.र.नं- १३१/२०१२ भा.द.वि.३५.४ सह बाललैगिक अत्याचार कायदा, २) गु.र.नं- १९१/२०१९ भा.द.वि ३९५३ ) गु.र.नं ६९/२०२० भा.द.वि.३५४ सह बाललैगिक अत्याचार कायदा या प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला गुन्हयाचे तपासकामी दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस पथकाचे ताब्यात देणार असलेची माहीती स.पो.नि. सोमनाथ लांडे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी दिलेली आहे. सदरची कारवाई मा.अभिनव देशमुख सो. (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा.मिलींद मोहीते सो. (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण), मा.नारायण शिरगावकर सो. ( उपविभागीय पोलीस अधिकारी सो., बारामती उपविभाग , पुणे ग्रामीण ) यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.सोमनाथ लांडे व त्यांचे पोलीस पथकातील पो.कॉ अक्षय सिताप, सलमान खान, अमोल भुजबळ, रामचंद्र आढाव, ज्ञानेश्वर सानप यांनी केलेली आहे.