-->
होळमध्ये कोरोना तपासणीत ३९ जण कोरोना पॉझिटिव्ह;  कॅम्पमध्ये ९५० लोकांना दिली कोरोना प्रतिबंधात्मक लस

होळमध्ये कोरोना तपासणीत ३९ जण कोरोना पॉझिटिव्ह; कॅम्पमध्ये ९५० लोकांना दिली कोरोना प्रतिबंधात्मक लस

वडगांव निंबाळकर - बारामती तालुक्यातील होळ ग्रामपंचायत येथे ५ कॅम्प मध्ये होळ येथील ९५० ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधीत लसीकरणचा १ला डोस दिले व कोविड अॅन्टीजन तपासणी १९० केली त्यामध्ये होळ मधील ११, सदोबाचीवाडीतील ९ व इतर गावातील १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
       यावेळी प्रांताधिकारी श्री.दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्री.विजय पाटील, एपीआय श्री.सोमनाथ लांडे साहेब, पंचायत समिती सभापती सौ. नीता फरांदे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री.संभाजी होळकर, श्री संदिप पाटील चेअरमन दुधसंघ, सरपंच श्री.संतोष होळकर पाटील हे येथील कोरोना प्रतिबंधीत लसीकरण करतेवेळी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article