-->
महाराष्ट्रातील सव्वा कोटी लोकांचे लसीकरण पुर्ण, पहा इतर राज्यांची आकडेवारी

महाराष्ट्रातील सव्वा कोटी लोकांचे लसीकरण पुर्ण, पहा इतर राज्यांची आकडेवारी

कोऱ्हाळे बु- आज पर्यंत जगातील ३ टक्के तर भारतातील 1.6 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. देशातील 14 कोटी 9 लाख 16 हजार 470 लोकांना तर महाराष्ट्रातील 1 कोटी 26 लाख 39 हजार 618 लोकांना आजपर्यंत लस दिली आहे. लसीकरणात राज्य संपूर्ण देशात आघाडीवर आहे. भारतात लसीकरणाची गती वाढलेली मृत्यूदरही एकूण 1.14 टक्के वरून एकूण 1.13 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आज घडीला जगाची लोकसंख्या 786 कोटी 15 लाखांच्या घरात आहे. त्यापैकी शंभर कोटी 20 लाख लोकांना लस दिली. मात्र लसीचे दोन्ही डोस मिळालेल्याची संख्या 23 कोटी 20 लाख इतकीच आहे. लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण तीन टक्के आहे. भारताची लोकसंख्या 139 कोटी 10 लाख 12 हजार 516 असून यापैकी 14 कोटी 9 लाख 16 हजार 470 लोकांना कोरोना वरील दिली. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १०.१३ टक्के लोकांना लस दिली असली तरी लसीचे दोन डोस मिळालेल्यांची संख्या 2 कोटी 22 लाख 56 हजार 200 इतकी आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झालेल्यांची सरासरी टक्केवारी केवळ 1.6 आहे.

राज्य व लसीकरण
महाराष्ट्र 1,26,39,618
राजस्थान 1,00,04,254
उत्तरप्रदेश 92,72,230
गुजरात 95,06,442
पश्चिम बंगाल 88,89,259
कर्नाटक 76,28,446
मध्यप्रदेश 66,94,427
केरळ 63,51,245
तामिळनाडू 45,41,557
हरियाणा 29,31,860 

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article