
बारामती; विनाकारण फिरणाऱ्या ७१ जणांची तपासणी; ६ जण पॉझिटिव्ह
Tuesday, April 27, 2021
Edit
बारामती - राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आज बारामती येथील पेन्सिल चौक परिसरात रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची बारामती पोलीस, आरोग्य विभाग, पंचायत समिती,बारामती यांच्या वतीने अँटीजेन तपासणी करण्यात आली.
यासाठी एक तपासणी कँप आयोजित करण्यात आला होता. यामध्ये ७१ जणांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६ नागरिक पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना तातडीने पुढील उपचारांकरीता रुग्णालयांत दाखल केले.
यावेळी तालुका अधिकारी डॉ मनोज खोमणे व सहकारी आणि पोलिस निरीक्षक महेश ढवाण व सहकारी उपस्थित होते.