
कवयित्री सौ. विद्या जाधव यांचा "कोंदण" हा काव्यसंग्रह विशेष राज्यस्तरीय सन्मानास प्रात्र
Thursday, May 20, 2021
Edit
बारामती (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षिका असणार्या विद्या रमेश जाधव उर्फ कवयित्री विरजा यांच्या स्त्रीमनाचा ठाव घेणार्या, बळीराजाची व्यथा मांडणार्या "कोंदण" या काव्यसंग्रहाचा देखणा प्रकाशनसोहळा मोरगाव येथे महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत पार पडला होता. या काव्यसंग्रहास मिळणारा हा दुसरा पुरस्कार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत जोगदंड यांच्या 'काव्यार्चना' या काव्यसंग्रहाच्या निमित्ताने हा पुरस्कार सोहळा विश्वरत्न इंग्लिश मिडीयम स्कूल पुणे व विष्णूपंत ताम्हणे विद्यालय, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पुढील महिन्यात पार पडणार आहे.
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचे कवी जोगदंड यांनी सांगितले.