-->
बारामती; हुमणी किड नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन- तालुका कृषी अधिकारी  दत्तात्रय पडवळ

बारामती; हुमणी किड नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन- तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ

मोरगांव :  हुमणी या  किडीमुळे  दरवर्षी भुईमूग , ज्वारी , बाजरी , मका  या पिकांचे नुकसान होते.हे नुकसानीचे प्रमाण तीस ते ऐंशी टक्के प्रमाणात वाढू शकते .यामुळे हुमणी  किडीचे समोर नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात  प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन  तालुका कृषी अधिकारी  दत्तात्रय पडवळ  यांनी केले आहे.

       अवघ्या काही दिवसांवर  येऊन ठेवलेल्या  खरीप हंगामाच्या पुर्व मशागतीची कामे शेतकऱ्यांनी पुर्ण केली  आहेत . खरीप हंगामात  तालुक्यातील ग्रामीण भागात मका ,ऊस , भूईमुग,  बाजरी पिक मोठ्या प्रमाणात केले जाते . पहील्या पावसानंतर हुमणीचे भुंगेरे जमीनीतुन बाहेर येऊन मिलनासाठी बाभूळ , कडुलिंब , बोर या झाडावर जमा होतात .  यानंतर जमीनीत ८ ते १० सेमी  खोलवर अंडी  घालतात . तर यांपासुन  पिकाचे  प्रत्यक्ष नुकसान होण्यास  ऑगस्ट ते सप्टेंबर   महीन्यांत सुरुवात होते .  जसजशी त्यांची संख्या वाढत जाते तसे  नुकसान होण्यास सुरवात होते.

      यासाठी शेताध्ये  प्रकाश सापळे लावण्याचे आवाहन  कृषी खात्यामार्फत करण्यात येत आहे .तसेच हुमणी  रोग नियंत्रणासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रकाश सापळ्याद्वारे मृत हुमणी किडे  प्रति किलो 300 रुपये किलो दराने घेतले जाणार आहेत .  हुमणी समुळ नष्ट करण्यासाठी कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना  प्रोत्साहित केले आहे.

      मोरगाव परिसरातील ढोले मळा , मोरगाव येथे अनेक शेतकऱ्यांनी  प्रकाश सापळे लावले आहेत.  

   प्रकाश सापळा कसा तयार करावा


कृषी खात्याच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की , शेतामध्ये खड्डा घेऊन त्यामध्ये प्लास्टीक कागद आंथरुन पाण्याने खड्डा भरावा . त्यावर डिझेल , पेट्रोल अथवा रॉकेलचा  तवंग द्यावा  .प्रकाशासाठी रात्रीच्या वेळेस बल्ब लावून  रात्री ७- ९ या वेळेत सुरु ठेवावा  . यामुळे हुमणीचे किडे   प्रकाशा  कडे आकर्षित होतात व साचलेल्या पाण्यामध्ये पडल्यामुळे मृत पावतात  अशाप्रकारे या हुमणी  समूळ नष्ट करता येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या या आव्हानाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. 

 कृषी पर्यवेक्षक  मोरगाव  :  प्रसाद तावरे 

फोटो : मोरगांव ता . बारामती येथील शंकर नारायण ढोले  यांच्या शेतात तयार केलेला  प्रकाश सापळा .

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article