
मोरगाव: ५० बेडचे कोव्हीड सेंटर होणार सुरू
Wednesday, May 5, 2021
Edit
मोरगाव : बारामती तालुक्यातील मोरगाव सह परिसरात वाढती कोरणा रुग्णांची संख्या लक्षात घेता येथील आरोग्य विभाग, मोरगाव फाउंडेशन व ग्रामपंचायत मोरगाव यांच्या विद्यमाने 50 बेडचे कोरणा विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहे. या कक्षाशी पाहणी बारामती प्रांताधिकारी दादासो कांबळे यांनी आज केली
मोरगाव सह परिसरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, तसेच कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. मात्र लक्षणे काहीही नाहीत अशा प्रत्येक रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्याची सोय नसल्याने कोरोना यांची संख्या वाढत चालली आहे .यामुळे मोरगांव ग्रामपंचायत, माहेश्वरी भक्त निवास, जय गणेश प्रतीष्ठाण, संस्कृती युवा प्रतिष्ठान, व आरोग्य विभागाच्या वतीने कोरोणा विलीनीकरण कक्ष सुरू केला जाणार आहे.यासाठी गावातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे, काही दानशूर व्यक्ती, चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने साहित्य तसेच आर्थिक स्वरुपात सहकारी केले असल्याची माहिती सरपंच निलेश केदारी यांनी दिली.
या कक्षाची पाहणी आज दि ५ रोजी बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी केली. यावेळी गावचे सरपंच निलेश केदारी ग्रामसेवक मोरेश्वर गाडे, वैद्यकीय अधिकारी बेलदार मॅडम, तसेच फाउंडेशन व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कक्षामध्ये आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार मोरगाव सह परिसरातील बाधित रुग्णांना यामध्ये ठेवले जाणार आहे .तसेच त्यांच्यावर मोफत औषधोपचार व जेवण नाश्त्याची सोय केली जाणार आहे. रुग्णांची देखभाल करण्यासाठी यामध्ये निवासी वैद्यकीय अधीकारी व कर्मचारी ठेवले जाणार असून पुढील दोन दिवसांमध्ये सुरु होणार आहे .