-->
बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वसंत मोरे, उपाध्यक्षपदी कल्याण पंचांगणे व युवराज खोमणे तर सचिवपदी चिंतामणी क्षीरसागर यांची निवड

बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वसंत मोरे, उपाध्यक्षपदी कल्याण पंचांगणे व युवराज खोमणे तर सचिवपदी चिंतामणी क्षीरसागर यांची निवड

कोऱ्हाळे बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आजतक चॅनल चे बारामती प्रतिनिधी वसंत मोरे यांची तर सचिवपदी सकाळचे चिंतामणी क्षिरसागर, उपाध्यक्ष कल्याण पाचांगणे, युवराज खोमणे, सहसचिव गजाजन हगवणे तर खजिनदार सुदाम  नेवसे यांची बिनविरोध निवड पार पडली. 
    
        या संघटनेची आज वार्षिक सभा सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर या ठिकाणी पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे मावळते अध्यक्ष महेश जगताप हे होते यावेळी माणिकराव दांगडे पाटील, दत्ता माळशिकारे, गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर,राजेंद्र गलांडे, सोमनाथ भिले, कल्याण पाचांगणे, अमोल यादव, युवराज खोमणे, विजय मोरे, विजय गोलांडे, सचिन वाघ, हेमंत गडकरी, काशीनाथ पिंगळे, मनोहर तावरे, अशोक वेदपाठक, विनोद पवार, अनिल धुमाळ, तुषार धुमाळ, सचिन पवार, सचिन वाघ,गोरख जाधव, नवनाथ बोरकर, विनोद गोलांडे, अमर वाघ,  यांच्यासह सदस्य उपस्थित होते. 
           सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सचीव चिंतामणी क्षीरसागर यांनी केले तर आभार नवनिर्वाचित उपाध्यक्ष कल्याण पाचांगणे यांनी केले.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article