
सोमेश्वर कारखाना निवडणूक: काल त्या केळाच्या फलकाची चर्चा; आज संपूर्ण गावाने एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय, प्रचाराच्या नारळादिवशी अशा निर्णयाने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली
Tuesday, October 5, 2021
Edit
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत कारखाना स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच कारखाना निवडणूकिमध्ये आख्य गावच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहे. वाघळवाडी ग्रामस्थांनी आज एकत्र येत गाव बैठकीत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवलं.
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक सध्या लागली आहे.यामध्ये वाघळवाडी गावास उमेदवारी देण्यात आली नाही.सोमेश्वर कारखाना उभारणीसाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी कारखान्यासाठी विना मोबदला देण्यात आल्या. कारखाना उभारणीत मोठा सहभाग असलेल्या वाघळवाडी ग्रामस्थांना कारखाना स्थापन झाल्यापासून संचालक पदी संधी देण्यात आली नाही. सोमेश्वर कारखाना नोकर भरती मध्ये सुध्दा युवकांना वगळे जाते. कारखान्यात संधी मिळालेले संचालक आपल्या जवळचे युवक नोकरी लावण्यात प्राधान्य देतात. आजपर्यंत संचालक नसलेल्या वाघळवाडीकरना यामुळे नोकर भरतीत सुध्दा डावले जाते.हे ग्रामस्थांनी अनेक वेळा बोलून दाखविले याकडे सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे बैठकीत ग्रामस्थांनी बोलून दाखविले.
60 वर्ष कारखाना स्थापन होऊन उलटून गेली तरी उमेदवारी दिली नसल्याने या वर्षी उमेदवारी मिळेल अशी खात्री होती.परंतु पुन्हा डावल्या गेल्याने जवळपास तीनशे गावातील ग्रामस्थ आणि युवकांनी एकत्र येत सोमेश्वर कारखाना निवडणूकित मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादी पक्षा कडून गावातील पाच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत बैठकीत पाच पैकी कोणत्याही एका उमेदवारांस उमेदवारी मागणीचे सह्यांची मोहीम घेऊन त्याचे निवेदन पक्ष श्रेष्टीकडे देण्यात आले होते.आणि मुलाखती दरम्यान उमेदवारानी एकत्र मागणी करताना पाच पैकी कोणत्याही एकाला उमेदवारी द्यावी असे म्हणणे पक्ष श्रेष्टीकडे मांडले होते. परंतु उमेदवारी मिळणार अशी खात्री कारखाना परिसरात असताना उमेदवार यादी प्रसिद्ध होताच यादीत नावे न आल्याने वाघळवाडी गावास संचालक पदापासून पुन्हा दूर ठेवण्यात आले. यादीमध्ये दोनशे ते तीनशे मतदान असलेल्या गावात एक तर दोन उमेदवार दिलेत.गावात जवळपास चारशे मतदार असतानाही एक सुध्दा उमेदवारी 60 वर्ष झाले तरी दिली नसल्याने गावातील सर्वानी तीव्र नाराजी व्यक्त करत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आज पार पडलेल्या गाव बैठकीत निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी एक मुखाने घेतला. गावामध्ये कोणी कारखाना निवडणूकीच्या प्रचारासाठी आले तर सहभागी होयचे नाही. अनुउपस्थिती दर्शवत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे सर्व ग्रामस्थांनी ठरविले आहे.
अजितदादा काय घेणार निर्णय?
वाघळवाडी गावाने घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीची मोठी डोकेदुखी वाढली आहे. शनिवारी कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांनी कोणाचाही रुसवा फुगवा काढणार नाही असे म्हटले होते त्यामुळे आता वाघळवाडी गावच्या मतदान बहिष्कार निर्णयावर अजितदादा काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण सभासदांचे लक्ष लागले आहे.