
मोरगाव: अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेले मयुरेश्वर मंदिर उद्या सर्व भावीकांना दर्शनासाठी होणार खुले
Wednesday, October 6, 2021
Edit
मोरगाव : राज्यशासनाने काढलेल्या आदेशानुसार अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र असलेले मयुरेश्वर मंदिर उद्या सर्व भावीकांना दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थान ट्रस्टने नियमावली तयार केली असून मंदिर परीसर निर्जंतुक केला केला असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली
उद्या पहाटे नेहमीप्रमाणे गुरव मंदिरडळींची प्रक्षाळ पुजा झाल्यानंतर मयुरेश्वर मंदिर सर्व भक्तांना दर्शनासाठी खुलेकेले जाणार आहे. मास्कशिवाय कुठल्याही भक्तांना मंदिर प्रवेश दिला जाणार नसून लेकुरवाळ्या महीला, ६५ वर्षावरील नागरीक, १० वर्षाखालील मुलांनी मंदिरात येण्याचे टाळावे असे आवाहन ट्रस्टकडून केले आहे. मंदिराच्या दर्शनी बाजुला कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे भावीकांनी पाळावयाच्या सूचना नमूद केल्या आहेत.
दररोज किती भावीकांना दर्शन देयचे याबाबत कुठलीही नियमावली देवस्थाने जाहीर केली नसली तरी भक्तांची वाढणारी गर्दी व शासकीय आदेश यानुसार योग्य बदल केला जाणार आहे. भक्तांना मंदिर कार्यालयात आर्थिक दान पावत्या करता येणार आहेत. देवस्थान मार्फत सुरु असणारा महाप्रसाद पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहे. तसेच भक्तांनी सामुदाईकपणे श्रींचे दर्शन घेण्याचे टाळावे असे मंदिर व्यवस्थापन समीती कडुन आवाहन केले आहे.
१) भक्तांसाठी बनविण्यात आलेली सुसज्ज दर्शन रांग
३) मंदिर निर्जुंतुकीकरन