
दहा वर्षापूर्वी बळजबरीने घेतलेली म्हाडा कॉलनीतील जुगार अड्डाची खोली मूळ मालकिणीच्या ताब्यात
Sunday, February 6, 2022
Edit
दोन दिवसापूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी पथकामार्फत म्हाडा कॉलनी बारामती या ठिकाणी फारुख बबन बागवान याच्या पत्त्याच्या क्लब वर छापा मारून दहा लोकांना अटक केलेली होती. सदर जुगार अड्डा खोली सायरा बानू राजन पठाण यांच्या मालकीची होती. क्लब चालक फारुख बबन बागवान याने सदरची खोली दहा वर्षापूर्वी बळजबरीने. सायराबानू पठाण यांच्याकडून ताब्यात घेऊन. बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवली होती. सदर खोली वारंवार तक्रार दर यांनी फारुक यांच्याकडे मागणी करूनही त्यांना दिली नाही. उलट त्यांचे पती सरकारी नोकर असल्याने त्यांच्या पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच त्यांच्या मुलांचे जीवाचे बरे वाईट करू अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी ते पुण्याला राहण्यास गेले होते. व त्या ठिकाणी फारुक बागवान याने पत्त्याचा जुगार सुरू केला होता. पेपरमध्ये बातमी वाचून त्यांनी बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना वरील प्रमाणे हकीगत सांगितली असता त्यांनी तात्काळ सायरा बानो पठाण यांचा गुन्हा नोंद करून घेऊन फारुख बबन बागवान याला तात्काळ अटक करण्यात आली. व सदरची खोली तात्काळ फारुक बागवान याला खाली करून देण्यास सांगितले. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करताच फारुक बागवान यांनी तात्काळ खोली रिकामी करून दिली सदरची तक्रार सायराबानू पठाण यांनी पोलिसांचे आभार मानले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मोरे हे करत आहेत