
युवासेनेच्या पुणे जिल्हा चिटणीसपदी तुकाराम भापकर
Tuesday, February 8, 2022
Edit
मोरगाव : बारामती लोकसभा मतदारसंघ युवासेना जिल्हा कार्यकारणीची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये परेश तुकाराम भापकर यांची पुणे जिल्हा चिटणीस पदी निवड झाली.
शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरुण सरदेसाई, गणेश कवडे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिल्हा कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये बारामती तालुक्यातील तरडोली येथील परेश भापकर यांची पुणे जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे . या निवडीनंतर बोलताना भापकर यांनी सांगितले की, पक्ष संघटना गावपातळीवर बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असून शिवसेनेची विचारधारा प्रत्येक व्यक्तीप्रर्यत पोहचविणार आहे.