-->
विधायक कार्यक्रमाने साजरी होणारी जयंती हेच महापुरुषांना खरे अभिवादन - पोलीस निरीक्षक सुनील महाडिक

विधायक कार्यक्रमाने साजरी होणारी जयंती हेच महापुरुषांना खरे अभिवादन - पोलीस निरीक्षक सुनील महाडिक

प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न, प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथील मिशन बोर्डिंग येथे येथील अनाथ मुलांना अन्नदान करून शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व आठ नंबर बॉईज ग्रुप चे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाडिक साहेब यांच्या हस्ते रिमांड होम मधील मुलांना शालेय साहित्य व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये शालेय बॅग, ड्राॅईंग वही, ड्राॅईंग कलर, स्केचपेन, कॅरम बोर्ड, क्रिकेट बॅट, टेनिस बाॅल,पेन, इ.शालोपयोगी वस्तू, खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक म्हणाले की, जयंती साजरी करताना विधायक उपक्रमाची जोड देवून हा उत्सव साजरा करावा आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज घडवण्यात हातभार लावावा.
 बाबासाहेबांनी केलेला संघर्ष प्रत्येक तरुणाने डोळ्यासमोर ठेवून समाजाचा खरा उत्कर्ष साधावा हेच खरे अभिवादन महापुरुषांना केले जावे, असे मत व्यक्त करत महाडिक यांनी उपस्थितांची मने जिंकली. यानंतर गुरव साहेब यांच्या हस्ते लहान मुलांना अन्नदान करण्यात आले, यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की आजचा समाज घडवणे हेच तरुणांसमोर उद्दिष्ट असावे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, व संघर्ष करा या उक्तीप्रमाणे कार्य करावे. यानंतर बारामती येथील वनपरिक्षेत्रातील पशूपक्ष्यांना व प्राण्यांना वाॅटर पाॅईंट येथे टॅकरद्वारे पाणीपुरवठा देखील करण्यात आल्याचे 8 नंबर बॉईस ग्रुप चे गणेश लंकेश्वर यांनी सांगितले.

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article