-->
वडगाव निंबाळकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  महावीर जयंती, महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

वडगाव निंबाळकर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंती, महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

    सर्वांनी एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश जयंती केली उत्साहात साजरी 

 प्रतिनिधी :- सुनील जाधव 
वडगाव निंबाळकर दि. 14 एप्रिल  रोजी वडगाव निंबाळकर  स्वातंत्र्य विद्या मंदिर शाळेसमोर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर, रायझिंग स्टार स्कूल येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महावीर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी रांगोळी गुरुजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व वर्धमान महावीर व महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. यावेळी वडगाव निंबाळकर परिसरातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे फणसे साहेब, चौधरी साहेब जगताप मॅडम व इतर कर्मचारी यांनी हजेरी लावली. प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषीं आबा गायकवाड, प्रशांतजी कांबळे, संग्रामभाऊ सोरटे उपस्थिती होते. सर्वजण एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश देत थोर मानवास अभिवादन केले. तसेच यावेळी राजेश्वरराजे राजे निंबाळकर,बाबा शिंदे, धैर्यशील राजेनिंबाळकर, नाना मदने, दादा निंबाळकर, सचिन साळवे, संजय साळवे, सचिन गायकवाड,राजेश्वरी साळवे,सदस्य खोमणे ताई,संगीता शहा, सुनील ढोले निलेश साळवे,गणेश रांगोळे,मयुरी साळवे, भूषण दरेकर,अमोल गायकवाड, छोटू जाधव,संतोष पवार, राहुल आगम,  साळवेपरिवार ,किशोर साळुंखे, अनिल जाधव, सचिन साठे,अभी साळवे,नंदू जाधव,संतोष दरेकर,सोनू राऊत अनेक ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली. सचिन साळवे यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली. तसेच रायझिंग स्टार स्कूल येथे अमोल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. व कार्यक्रम संपन्न झाला.

Related Posts

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article