
शिक्षकाचा मुलगा बनला गटविकास अधिकारी
Monday, June 13, 2022
Edit
पणदरे ता. बारामती येथील संकेत राहुल गायकवाड यांनी एमपीएससी परीक्षेत यश संपादन करत थेट सहाय्यक गटविकास अधिकारी पदाला गवसणी घातली आहे यानिमित्ताने संकेत गायकवाड यांची मिरवणूक काढत ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते अँड.एस. एन. जगताप, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनोद जावळे, महेंद्र साळवे, तानाजी भोसले यांनी मनोगत व्यक्त केले या वेळी मा उपसरपंच सत्यजीत जगताप, चंद्रकांत जावळे व ग्रामस्थ उपस्थित होते संकेत गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण पणदरे येथील प्राथमिक शाळेत तर उच्च माध्यमिक शिक्षण नव महाराष्ट्र विद्यालय पणदरे आणि महाविद्यालय शिक्षण बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात पार पडले त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे बी.टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे सन 2020 मध्ये घेतलेल्या एमपीएससी परीक्षेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी यश संपादन केले आहे संकेत गायकवाड यांचे वडील बजरंग वाडी येथे प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे आई गृहिणी असून एक भाऊ एमबीबीएस शिक्षण घेत आहे युवकांनी उच्च शिक्षण घेत गावाचे नाव रोशन करावी असे आव्हान त्यांनी सत्काराला उत्तर देताना केले. सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले व आभार अमोल गायकवाड सर मांडले.